Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली 26 जूनला होणाऱ्या चक्का जाम आंदोलनात प्रचंड ताकदीने सहभागी व्हावे – सलीम जहाँगीर, भगीरथ बियाणी

बीड ( प्रतिनिधी ) राज्यात महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. ओबीसींचा राजकीय विकास राज्य सरकारच्या डोळ्यात खुपत असून हा मोठा अन्याय आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात आणि राजकीय आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या आदेशावरून शनिवार दि.26 जून रोजी सकाळी 10 वाजता बीड बसस्थानकासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून न्याय हक्कासाठी होत असलेल्या आंदोलनात प्रचंड ताकदीने सहभागी व्हा असे आवाहन भाजप नेते सलीम जहाँगीर , भगीरथ बियाणी यांनी केले आहे.

भाजप नेते सलीम जहाँगीर, भगीरथ बियाणी यांनी म्हटले आहे की, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे हे दुर्दैवी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या , नगर पालिका, नगर पंचायत अशा ठिकाणी ओबीसींना प्रतिनिधित्व करण्याची संधी नाकारण्याचे कारस्थान रचले जात आहे. या निर्णयामुळे कोणत्याही जाती धर्मातील ओबीसी असलेल्या व्यक्तींचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारच्या वेळकाढूपणा व नाकर्तेपणामुळे ही वेळ आली असून स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकिय आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवायचे असेल तर रस्त्यावर उतरावेच लागेल. राजकिय आरक्षण हिरावून घेण्याऱ्या महाविकास आघाडीचा धिक्कार करण्यासाठी आणि पुन्हा आरक्षण मिळवण्यासाठी सर्व जाती धर्मातील ओबीसींनी एकत्र यावे. आपली प्रचंड ताकद राज्य सरकारला दाखवून द्यावी असे आवाहन भाजप नेते सलीम जहाँगीर , भगीरथ बियाणी यांनी केले आहे.

Exit mobile version