बीड (प्रतिनिधी):- बीड शहरामध्ये अनेक वार्डात 0 ते 6 वयो गटातील बालकांसाठी अनेक ठिकाणी अंगणवाडी केंद्र उपलब्ध नाहीत. शहरातील वाढीव लोकसंख्या लक्षात घेता आणखी 25 नवीन अंगणवाडी केंद्र शहरासाठी मंजुर करण्यात यावेत अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकुर यांच्याकडे केली आहे. यशोमतीताई ठाकुर यांनी या मागणी बाबत सकारात्मक भूमिका व्यक्त या बाबत तातडीने प्रस्ताव मागवुन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बुधवार दि.23 जुन रोजी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी मुंबई येथे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकुर यांची भेट घेवून सविस्तर निवेदन दिले. बीड शहरामध्ये अनेक वार्डात 0 ते 6 वयो गटातील बालकांसाठी अंगणवाडी केंद्र उपलब्ध नाहीत. शहरात व शहराच्या हद्दवाढ भागात अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी शहरातील अनेक भागातील नागरीकांकडून करण्यात येत होती. 0 ते 6 वयो गटातील बालकांसाठी नवीन 25 अंगणवाडी केंद्र उभा करून त्यांना योग्य त्या सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी या निवेदनात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यानं केली आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करत मंत्री यशोमतीताई ठाकुर यांनी तात्काळ प्रस्ताव मागवून कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहे. त्यामुळे आता बीड शहरात नवीन 25 अंगणवाडी केंद्र उभारणीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.