बीड प्रतिनिधी
लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील पोखरी ते बाबरवस्ती, हिंदोळेवस्ती या रस्त्यावर एक पुलाची तातडीची गरज आहे. या पुलामुळे पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना रहदारीसाठी समस्या निर्माण होते. शाळकरी मुले व वयोवृद्ध ग्रामस्थांना नाला ओलांडून जाने जिकरीचे झाले होते. या नाल्यावर किमान नळकांडी पूल बांधून हा रस्ता सुव्यवस्थित करून द्यावा अशी मागणी वस्ती परिसरातील लोकांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन कोणत्याही शासकीय योजनेची प्रतीक्षा न करता वस्तीवरील लोकांसाठी रस्त्याची अडचण दूर करण्यासाठी स्वखर्चातून हे पूल बांधकाम करण्याचा निर्णय घेतला.
आज सकाळी राजेंद्र मस्के यांनी रस्त्यावर जाऊन पुल बांधकामाच्या ठिकाणी नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला. यावेळी दादासाहेब खिल्लारे,बालासाहेब माने,दशरथ दळवे,अंबरनाथ मुळीक,दामोदर हिंदोळे, सोमीनाथ बाबर,ज्ञानेश्वर बाबर,बाळू साबळे,रोहिदास फाळके,सिद्धू बाबर,नवनाथ बाबर,बबन बाबर,कुंडलिक फाळके,बाबासाहेब माने,विष्णू साबळे,विक्रम फाळके,शरद बडगे,महेश सावंत,बद्रीनाथ जटाळ,चत्रभुज फाळके, आदी उपस्थित होते.
पोखरी-बाबरवस्ती-हिंदोळे वस्ती रस्त्यावरील पूल बांधकाम करणार- राजेंद्र मस्के
