सिरसाळा, दि. 23 (लोकाशा न्यूज) : राखेचा टिप्पर सोडण्यासाठी सिरसाळा पोलीस ठाण्यातील दोन लाचखोर कर्मचार्यांनी संबंधीताकडे लाचेची मागणी केली होती. यात दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते. दोन हजार रुपये घेताना दोन कर्मचार्यांना उस्मानाबद लाचलूचपत विभागाच्या कर्मचार्यांनी रंगेहाथ पकडले. गेल्या काही दिवसांपूर्वी सिरसाळा पोलीसांनी राखेचा टिप्पर पकडला होता. हा टिप्पर सोडण्यासाठी पोलीस कर्मचारी येरडलवार व उमेश कंकनवार या दोघाने संबंधीताकडे लाचेची मागणी केली होती. यात दोन हजार रुपये तडजोड झाली होती. मात्र संबंधीत टिप्पर चालकाने उस्मानाबाद लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली होती. बुधवारी दुपारी पैसे स्विकारताना येरडवार व उमेश कंकनवार या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरील या कारवाईने लाचखोर कर्मचार्यात एकच खळबळ उडाली.
राखेचा टिप्पर सोडण्यासाठी दोन हजार मागितले, उस्माणाबाद एसीबीने सिरसाळ्यातील दोन पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडले
