Site icon लोकाशा-बंब न्यूज

राज्य सरकारने निवडणुका रद्द कराव्यात – पंकजाताई मुंडे यांची मागणी,आरक्षणाशिवाय निवडणुका घेणं धक्कादायक

मुंबई । दिनांक २३।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचा निर्णय ओबीसींसाठी अन्यायकारक आहे, त्यामुळे राज्य सरकारने हया निवडणुका रद्द कराव्या अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी वृत्त वाहिन्यांशी बोलतांना केली.

राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम काल निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, यावर पंकजाताई मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या निर्णयाने ओबीसींवर घोर अन्याय केला आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका घेणं हे धक्कादायक आहे, असे त्या म्हणाल्या. इम्पिरिकल डेटासाठी केंद्राकडे बोट दाखवणं चुकीच आहे, त्यासाठी टास्क फोर्स नेमून सरकारने आपल्या यंत्रणेमार्फत डेटा मागवावा तथापि, डेटाच्या आधारे निर्णय राहिला असं म्हणणं अमान्य आहे. राज्य सरकारकडून ओबीसींची दिशाभूल केली जातेयं असे सांगून हया निवडणुका तातडीने रद्द कराव्या, यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
••••

Exit mobile version