बीड । दिनांक १८।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपले गाऱ्हाणे मांडण्यास जाणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना पोलिसांनी केलेली धक्काबुक्की आणि लाठीमार हे संतापजनक आहे. अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं,अशी टीका भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
एका मराठी वृतवाहिनी शी बोलताना पंकजाताई मुंडे ह्या म्हणाल्या की,”हा सगळा प्रकार संतापजनक आहे.ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले.स्वत:च्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आले आहेत तर जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अजित पवारांची भेट घडवून आणणं तिथल्या स्थानिक नेत्यांचं काम होतं.त्यांनी ठरवलं असतं तर गोंधळ झाला नसता.मागण्या तर पूर्ण होत नाहीत,पण किमान भेट आणि बोलू द्यायला हवं होतं.स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्यांना अशाप्रकारे धक्काबुक्की आणि लाठीमार हे संतापजनक आहे.अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं”,अशा शब्दात पंकजाताई मुंडे यांनी टीका केली आहे.
••••