Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळीत गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसांसह एकाच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या ; डीबी शाखेच्या भास्कर केंद्रेची धडाकेबाज कारवाई

परळी वैजनाथ दि.१७ ( लोकाशा न्युज ) :- परळी शहरात आज भर दुपारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी शाखेचे भास्कर केंद्रे यांनी एक पिस्टल दोन जिवंत काडतुसांसह एकाच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले. भास्कर केंद्रे यांची एकाच महिन्यात ही दुसरी धडाकेबाज कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील नाथ रोडवर एकाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती परळी शहर डी बी पथकाचे भास्कर केंद्रे यांना मिळताच त्यांनी सापळा रचुन एकास अटक केली. गावठी पिस्टल, दोन जीवंत काडतुस व मँग्जीन जप्त केले आहे. दिनांक १७ जुन २०२१ रोजी बातमी मिळाली की,अंदाजे दुपारी ३.०० च्या दरम्यान परळी येथील नाथ टॉकिज समोर एक ईसम थांबला आहे त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे अशी खात्रीलाईक बातमी मिळाल्याने माहीती दिलेल्या वर्णणावरुन डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, शंकर बुढ्ढे, तुकाराम मुरकुटे, सचिन सानप यांनी सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव अशोक मधुकर मुंडे वय ३४ राहणार पांगरी, तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड असे सांगीतले. अंगझडती घेतली असता कमरेला आतुन ठेवलेला एक गावठी पिस्टल मॅगझीन व दोन जींवत काडतुस मिळुन आले. कब्जात असलेल्या गावठी पिस्टलचे लायसन्स विचारले असता त्यांनी त्यांचेकडे शस्ञ बाळगण्याचे कोणतेही परवाना नसल्याचे सांगीतले. त्यांच्या विरुद्ध तुकाराम मुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस स्टेशन गुर.नं ९३/२०२१कलम ३/२५ भारतीय हत्यार कायदया प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.ही कार्यवाही परळी शहरचे पोलीस निरिक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शना खाली डी बी पथकाचे भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, तुकाराम मुरकुटे, सचिन सानप यांनी केली. पुढील तपास पोलीस जमादार दिगांबर चट्टे हे करत आहेत.

Exit mobile version