Site icon लोकाशा-बंब न्यूज

नगर रेल्वे पॉईंटवरून बीड जिल्ह्यातील पश्चिम बाजुस युरिया आणि रासायनिक खताचा पुरवठा करावा, खा. प्रीतमताईंची कृषी आयुक्तांकडे मागणी


बीड, जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हा एकमेव रेल्वे पॉईंट असून या ठिकाणी रासायनिक खताचे आवक – जावक बीड जिल्ह्यासाठी होत आहे . परंतु बीड जिल्ह्याच्या पश्चिम बाजूस आष्टी , पाटोदा , शिरूर कासार , गेवराई हे तालुके अहमदनगर रेल्वे पॉईंटवरून अत्यंत जवळ आहेत या रेल्वे पॉईंटवरून पूर्वीपासून बीड जिल्ह्यातील पश्चिम बाजूस रासायनिक खताचा पुरवठा होत आहे चालू स्थितीमध्ये बऱ्याच कंपन्यांनी अहमदनगर रेल्वे पॉईंटवरून बीड जिल्ह्याला युरिया व रासायनिक खते पोहोच करण्यासाठी मान्यता दिलेली आहे पण या प्रक्रियेत अडथळा येत आहे . तरी याबाबत आपण लक्ष घालुन सध्या येणाऱ्या रॅक मधून बीड जिल्ह्यासाठी नियमानुसार युरिया व इतर खताचा पुरवठा करावा , बीड जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे शेतकरी सध्या युरिया खताची ऊसासाठी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेमध्ये मागणी करत आहेत . ही मागणी लक्षात घेऊन बीड जिल्ह्यासाठी अतिरिक्त युरियाचा पुरवठा करणेबाबत कार्यवाही करून सहकार्य करावे ,अशी मागणी खा. प्रीतमताईंनी कृषी आयुक्तांकडे केली आहे .

Exit mobile version