Site icon लोकाशा-बंब न्यूज

72 हजारांपेक्षा अधिक आशा वर्कर्स आजपासून संपावर

पुणे -मानधन, आरोग्य सुविधा, विमा यासारख्या विविध मागण्यांसाठी राज्यातील 72 हजारांपेक्षा अधिक आशा वर्कर्सने आजपासून संपाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत संपर्क सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेकवेळा सांगूनही सरकार आमची दखल घेत नाही. कोरोना काळात कामे करुनही कमी मानधन दिले जात आहे. त्यामुळे राज्यभरातील 70 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तक संपाची हाक दिली आहे. या सर्वांनी एकत्रित येत हा संप करण्याचा निर्णय घेतला आहे.  याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा झाली आहे. त्यांच्या ज्या मागण्या योग्य आहेत त्या मान्य केल्या जातील. राज्य सरकार त्यांच्याबाबत योग्य आणि उचित निर्णय राज्य सरकार घेईल. त्या कुठलेही आंदोलन करणार नाही, असे ठरले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत उचित आणि योग्य निर्णय राज्य सरकार घेईल. ज्या आशा वर्कर्स आंदोलन करत असतील तर ते चुकीचे आहे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील, असेही राजेश टोपे म्हणाले.

या आहेत आशा वर्कर्सच्या मागण्या ?

Exit mobile version