Site icon लोकाशा-बंब न्यूज

दोन लाखाची लाच मागितल्याप्रकरणी एसबीचाच अधिकारी जाळ्यात ! बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल होणार, अप्पर पोलिस अधीक्षक मारूती पंडित यांच्या पथकाची कारवाई


बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : एसीबीमध्ये कार्यरत असताना सापळ्यात अडकलेल्या एका शाखा अभियंत्याला लाच मागितल्याच्या प्रकरणात बीड एसीबीचा तत्कालीन पोलीस निरीक्षक असलेल्या राजकुमार पडावी याच्यासह त्याच्या तत्कालीन रायटरच्या विरोधात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल होत आहे. बीड शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सध्या सुरु आहे. एसीबीच्या कार्यालयाने केलेल्या चौकशीत लाच मागितल्याचे समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल केला जात आहे. बीडच्या एसीबीने एप्रिलमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधकरणच्या शाखा अभियंत्याला एका हजाराची लाच घेताना पकडले होते. या प्रकरणात आरोपी शाखा अभियंता शेख समद नुर मोहम्मद याला मदत करण्यसाठी एसीबीचा तत्कालीन पीआय राजकुमार पडावी याने दोन लाखाची लाच मागितली आणि त्यानंतर त्यांचा रायटर प्रदिप वीर याने 50 हजारात ‘डिल’ फिक्स केल्याची तक्रार एसीबीच्या महासंचालक कार्यालयाकडे करण्यात आली होती. जमिलोद्दीन शेख यांनी ही तक्रार दिली होती. या तक्रारीवर एसीबीच्या कार्यालयाने चौकशी केली. या चौकशीत ’ मागणी केल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा एसीबी औरंगाबादचे पथक बीड शहरात दाखल झाले. औरंगाबादचे पथक बीड शहरात दाखल झाले. या पथकाने राजकुमार पडावी आणि प्रदिप वीर याच्या विरोधातील तक्रार बीड शहर पोलीसाकडे दिली असून शहर पोलीसात पडावी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एसीबीचे प्रभारी अप्पर पोलीस अधिक्षक मारोती पंडित, पोलीस निरीक्षक विकास घनवट, पोलीस हवलदार राजेंद्र जोशी, मिलींद इप्पर यांनी ही कारवाई केली. राजकुमार पडावी याची काही दिवसांपूर्वी बीडहून औरंगाबादला बदली झाली होती. त्यानंतर चार दिवसापूर्वीच त्याची मुंबई येथे बदली झाली आहे . तर प्रदिप वीर याला यापूर्वीच एसीबीमधून जिल्हा पोलीसात परत पाठविण्यात आले आहे. या दोघांविरोधात झालेल्या या कारवाईने पोलीस वर्तुळातही खळबळ माजली आहे.

Exit mobile version