द कुटे ग्रुपच्या गुड मॉर्निंग प्रॉडक्ट्सचे लॉंचिंग
बीड येथील तिरुमला ग्रुप आजवर एडिबल
ऑइल क्षेत्रात कार्यरत होता .आज द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे ,अर्चना कुटे, राधाकाकू कुटे , आर्यन कुटे ,यशवंत कुलकर्णी , डॉ. पद्माकर पाटोदेकर, आशिष पाटोदेकर, आशाताई पाटील पाटोदेकर, डॉ. फुलझळके यांच्यासह माध्यम क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते गुड मॉर्निंग डेअरी प्रॉडक्ट्सचे लॉंचिंग करण्यात आले . यावेळी गुड मॉर्निंग गाईचे दूध , दही,तूप ताक,पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांचे थाटात लॉंचिंग करण्यात आले .बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कुटे ग्रुपच्या डेअरी प्रॉडक्ट्सच्या ब्रँड अंबेसिडर आहेत .शिल्पा शेट्टी यांनी केलेल्या कुटे ग्रुपच्या दुग्धजन्य पदार्थांची “अब हर दिन की शुरूवात
गुड मॉर्निग कुटे ग्रुप के काऊ दूध के साथ “
अशी केलेली जाहिरात ही यावेळी लॉन्च करण्यात आली .
यावेळी द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे म्हणाले की,
आजूचा सोहळा सुदर झाला. आपल्या द कुटे ग्रुपचा
डेअरी प्रॉडक्ट आँज लॉन्च झाले. आता या पुढे ते
बाजारपेठेत दाखल होतील. बीड सारख्या मराठवाड्यातील एका उद्योजकाने सातारा जिल्ह्यातील फलटण येथे दुधाचा व्यवसाय सुरू करणं हे तेवढं सोपं
नव्हतं पण बीडेंच्या मातीच्या वैशिष्ट्ये म्हणजे प्रचंड कष्ट
करणे आणि आव्हाणे स्विकारण्याची ताकद या बळावर आम्ही हे शक्य करून दाखवलं. गेल्या २७ वर्षांपासून मी बिझनेस करतोय, या दरम्यान एकही दिवस आला नाही
की संकट, आव्हान आली नाहीत, पण आम्ही हरलो
नाहीत, काम क्रत राहिलो, आपल्यामुळे हजारो कुटूंब
चालतात ते कुठे अडचणीत यायला नकोत यासाठी द
कुटे ग्रुप काम करतो आहे. आज डेअरी प्रॉडक्ट लॉन्च
झाले हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करायचा होता पण, कोविडच्या अनुषंगाने मोजक्या मान्यवरांच्या
उपस्थितीत पार पडला. गेल्या दोन वर्षे घेतलेल्या
मेहनतीला यश आले. या निमित्ताने मराठवाडा, बीड
जिल्हा कुठेच कमी नाही हे कुटे ग्रुपने दाखवून दिले.
यासाठी कुटे ग्रुपमध्ये काम करणाऱ्या सर्व टीमचे योगदान खूप महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.
भावनिक नाते निर्माण करा-अर्चना कुटे
यावेळी द कुटे ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना कुटे म्हणाल्या की, आजचा दिवस सर्वांसाठी आनंदाचा आणि पुढे जाण्याची प्रेरणा देणारा आहे. दोन वर्षापासून या दिवसाची
आपण आतुरतेने वाट पहात होतोत. आज द कुटे ग्रुपच्या गुड मॉर्निंग डेअरी प्रॉडक्टचे लाँचिंग झाले आहे. आजपर्यंतच्या वाटचालीत विश्वास आणि गुणवत्ता हीच आपल्या कुटे ग्रुपची ओळख आहे. फलटण व तिसगाव प्लांटमधून या डेअरी
प्रॉडक्टची निर्मिती होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व इतर शेजारी राज्यात हे प्रॉडक्ट विक्रीसाठी उपलब्ध झाले असुन आता लवकरच महाराष्ट्र राज्यात सर्व ठिकाणी बाय प्रॉडक्ट उपलब्ध होणार आहेत. सेल्स टीमने अधिकाधिक चांगले
पेझेन्टेशन करावे. सर्वांशी आपुलकी आणि नम्रतेचे नाते निर्माण करावे, व्यवहारी होण्यापेक्षा विक्रेत्यांशी भावनिक नाते निर्माण करा. प्रत्येकाला आदर, सन्मान द्या. ‘हम जो कर
सकते है। वह हर कोई कर नहीं सकता।’ हे आपले ब्रीद आहे. त्यामुळे चांगले काम करण्यासाठी भेटणाऱ्या प्रत्येकाशी आपुलकीचे नाते निर्माण करा. गुड मॉर्निंग मिल्क प्रॉडक्टची जाहिरातीसाठी प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांची निवड केली ती त्यांचे फिटनेस पाहून केली असल्याचेही त्या म्हणाल्या.
अन् सुरेश कुटे हे अण्णांच्या आठवणीने गहिवरले….
मागच्या हेअर ऑईल लाँचीगच्यावेळी वडील स्व. ज्ञानोयराव (आण्णा) कुटे हे आपल्या सोबत होते. आज जरी ते आपल्यात नसले तरी,
त्यांच्या आठवणी आपल्यासोबत आहेत. त्यांची शिकवण आपल्याला उद्योगामध्ये कायम सोबत असणार आहे. बीडमधून कुटे ग्रुपची जी काही प्रगती झाली त्या मागे त्यांची सगळी दैवी शक्ती असल्याचा मला विश्वास आहे. रोजच्या अनुभवात मी हे सगळं अनुभवतो, अण्णा सोबत होते तेव्हा परमेश्वरचं आपल्या सोबत आहे, याची अनुभूती येत होती. दररोज घराबाहेर पडताना आत्ता अण्णांच्या प्रतिमेचे दर्शन घेतोय, आपली नीतिमत्ता कधी बदलू नये, त्यात काही फरक पडू नये हेच मागणी मी अण्णांकडे करतो असे म्हणत द कुटे गुपचे प्रमुख सुरेश कुटे अण्णांच्या आठवणीत क्षणभर गहिवरले.
कुटे ग्रुप म्हणजेच सक्सेस ग्रुप!-यशवंत कुलकर्णी
आपल्या सेल्स टीमला बिझनेस कळली पाहिजे. प्रत्येकाला काळजी आणि धाक असला पाहिजे. आपले उद्दिष्ट साध्य करण्याची काळजी केली की, प्रत्येक जण आपला सेल्स करण्यासाठी मनातून काम करतो. त्यामुळे आपले उद्दिष्ट पूर्ण
करण्यासाठी बिझनेस आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी काम करत रहा, त्यातूनच आपला कुटे ग्रुप
प्रगती करत राहील. ग्रुपची प्रगती हीच स्वतः ची प्रगती समजून एकदिलाने काम करा असे आवाहन याप्रसंगी कुटे ग्रुपचे संचालक यशवंत कुलकर्णी म्हणाले
यांनी केले.