बीड/प्रतिनिधी
मराठवाड्याचा पाणी प्रश्न असो की मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असो यासह शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि बीड शहरातील योजनांच्या बाबतीत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असे प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले आहेत
शनिवारी रात्री आठ वाजता राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली आहे, चर्चेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड आणि मराठवाड्यातील प्रश्न जाणून घेण्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना निमंत्रित केले यावेळी माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले की मराठवाड्याचा पाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून याबाबत आता गांभीर्याने घेणे आवश्यक असून मराठवाड्यात कधीतरी ओला दुष्काळ असतो मात्र कोरडा दुष्काळ सातत्यानेच असतो, पाणी ही मराठवाड्याची महत्त्वाची गरज आणि निकड आहे,मराठवाड्यासाठी 152 टीएमसी पाणी मिळावे यासाठी पश्चिम वाहिनी नद्या चे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी आपण सातत्याने मागणी केली आहे,याबाबत तत्कालीन मंत्रिमंडळ बैठकीत ठराव मांडण्यात आला त्या प्रस्तावाला मंजुरी देखील मिळाली आहे मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने पाण्याची गरज कायमची व पुढच्या पिढीसाठी पाणी प्रश्न सोडवणे खूप महत्त्वाचे असल्याचे ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले या बाबत बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की पश्चिम वाहिनीच्या वैतरणा , दमनगंगा सारख्या नद्या तील जास्तीचे पाणी समुद्रात वाहून जाते,हे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात मराठवाड्यातील अवर्षण ग्रस्त भागात वळवता येईल, वाहून जाणारे पश्चिम नद्यांचे पाणी मराठवाड्या कडे वळवण्याचा स्वप्नवृत प्रकल्प राबवता येईल, आपण त्यासाठी सतत पाठपुरावा ही केला आहे, या प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे हा प्रकल्प मराठवाड्याचे भाग्य बदलू शकतो, यासाठी समितीचीही नेमणूक झाली मात्र समितीचे काम संथ गतीने सुरू आहे, या कामाला वेग देऊन प्रकल्पाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे असे ते म्हणाले , त्याच बरोबर मराठा आरक्षण नक्कीच द्यायला हवे परंतु हे देत असताना ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता ते मंजूर करावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली बीड जिल्ह्यात 1600 कोटींचा खरीप पिककर्जाचा आराखडा(उद्दिष्टे) आहे त्यात केवळ 94 कोटीचे वाटप झाले आहे म्हणजे केवळ सहा ते सात टक्के शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून हजारो शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहिले आहेत याबाबत स्पष्ट सूचना देण्यात याव्यात व आपण लक्ष घालावे,जेणे करून शेतकऱ्यांना सावकाराकडे जाण्याची वेळ येणार नाही,विकास कामासाठी आलेला निधी हा थेट गावापर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायला हवा मात्र बीड जिल्ह्यात तसे होताना दिसत नाही यंदा पंढरपूरची आषाढी यात्रा आहे माझ्या बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाची पालखी दरवर्षी पंढरपूरला जात असते या पालखी सोहळ्यास मर्यादित वारकऱ्यांना परवानगी देण्यात यावी अशी आग्रहाची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली वीज वितरण कडून बीड नगरपालिकेला वेठीस धरण्याचा प्रयत्न चालू आहे शेजारी जिल्ह्यात जेवढे पथदिव्यांचे बिल येते त्याच्या चार पट म्हणजेच जवळपास 25 ते 30 लाख रुपये बिल आकारले जाते यासाठी मीटर बसवण्याची वारंवार मागणी केलेली आहे, जिल्ह्यात एकमेव नगरपालिका आपल्याकडे असून विकासासाठी भरीव निधी दिल्यास अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास जिल्ह्यातील बँका प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे वेळेवर कर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल बीड शहरातील दोन मोठ्या योजनेचे काम चालू आहे अमृता आणि भुयारी गटार योजनेचा निधी वेळेवर मिळणे गरजेचे असून ही कामे केवळ निधीअभावी प्रलंबित आहे या प्रश्न बरोबर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उकल माजी मंत्री क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानी घातली आहे आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत राज्यातील महत्वाच्या नेत्यांचा समावेश होता त्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना प्रथम आमंत्रित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्याचा सन्मानच केला आहे, चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले प्रश्न जाणून घेतले आहेत याशिवाय अनेक प्रश्न असतील ते आपण स्वतंत्रपणे माझ्या मेलवर अथवा प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे दिल्यास ते सोडवण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे