Site icon लोकाशा-बंब न्यूज

पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे दरोडा; तीन जण गंभीर जखमी

पाटोदा : पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे काल रात्री 12 च्या सुमारास जबर दरोडा पडला असून या मध्ये तीन जण जखमी झाले असून एकास धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत सदर जखमी रवींद्र शहादेव शीरसट यांना बीड येथील लोटस हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले आहे तर त्यांचे आई-वडील सखुबाई शादी शिरसाट वय 60 महादेव निवृत्ती शिरसाट वय वर्षे 65 यांना किरकोळ जखमी झाले असून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत यावेळी घटना घडलेली समजताच डीवायएसपी विजय लगारे साहेब पाटोदा पोलीस स्टेशन पी आय महेश आंधळे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह चुंबळी येथे हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास चालू आहे

Exit mobile version