बीड , चालु वर्षी बीड जिल्ह्यामध्ये ऊसाचे आणि सोयाबीनचे क्षेत्र वाढल्यामुळे युरिया आणि डीएपी या खतास शेतकऱ्यांची मागणी वाढलेली आहे . चालु महिन्यामध्ये डीएपीचे जिल्ह्यासाठी ५८०० मेट्रीक टन आवंटन मंजूर झाले आहे परंतु जिल्ह्यामध्ये साधारणतः दहा हजार मेट्रीक टन डीएपीची मागणी येत आहे . याबाबत आपण दिलेले आवं जास्तीचा डीएपी आणि युरिया बीड जिल्ह्यासाठी पुरवठा करावा . सध्या पाऊस वेळेवर येण्याचा अंदाज असल्यामुळे शेतकरी वर्ग बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहे . तरी याबाबत तात्काळ संबंधित कंपन्यांना आपल्या स्तरावरून आदेशित करावे व शेतकऱ्यांची अडचण दूर करावी, अशी मागणी खा प्रीतमताईंनी कृषी आयुक्तांकडे केली आहे.