Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडे, डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केला डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान,सेवा यज्ञातील योगदानाबद्दल कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा साडी-चोळी देऊन केला सत्कार

परळी । दिनांक ०४।
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या सेवा यज्ञात शहरातील डाॅक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव खूपच मोलाचा ठरला, त्यांच्यामुळेच अनेक रूग्ण कोरोनामुक्त होऊ शकले, त्यांचे ऋण कदापि विसरू शकणार नाही अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यां बरोबरच सेवा यज्ञासाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवरही त्यांनी कौतुकाची थाप देत ॠण व्यक्त केले.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सुक्ष्म लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांसाठी अक्षता मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या सेवा यज्ञाचा समारोप बुधवारी झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे, राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, विनोद सामत, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, निळकंठ चाटे, जयश्री मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोना रूग्णांसाठी सुरू केलेला सेवा यज्ञ सर्वाच्या सहकार्यातून यशस्वी झाला. डाॅक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव खूप मोलाचा होता. प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजूटीने आणि नियोजनबद्ध रितीने काम केल्याने हे शक्य झाले, या सर्वाचेच ऋण मी व्यक्त करते. असेच काम भविष्यातही होईल असा विश्वास पंकजाताईंनी व्यक्त केला.

यावेळी बोलतांना खा. प्रितमताई यांनी सेवा यज्ञात स्वतःला सेवा देता आली नाही याबद्दल खंत व्यक्त केली. आपल्या सेवेतून आम्ही अनेक रूग्णांना ठणठणीत बरे करू शकलो याचा आनंद आहे. डाॅक्टर्स, आरोग्य व स्वच्छता कर्मचारी व भाजपचे सर्व कार्यकर्ते यांनी गेले महिनाभर जे अतोनात कष्ट घेतले त्याबद्दल खरच कौतूक वाटते असे त्या म्हणाल्या.

डाॅक्टरांचा केला विशेष सन्मान
‐———————————
कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दररोज येऊन रूग्णांची तपासणी व औषधोपचार करत त्यांची काळजी घेणारे सेवा यज्ञातील डाॅक्टर्स डाॅ. हरिश्चंद्र वंगे,
डाॅ. एल. डी. लोहिया, डाॅ. शालिनी कराड, डाॅ. दिपक पाठक, डाॅ. विवेक दंडे, डाॅ. संदीप घुगे, डाॅ. दुष्यंत देशमुख, डाॅ. वाल्मिक मुंडे, डाॅ. आनंद मुंडे यांचा पंकजाताई व प्रितमताई यांच्या हस्ते वैद्यनाथाची चांदीची प्रतिमा देऊन विशेष सन्मान करण्यात आला. डाॅ. विनोद कांगणे, डाॅ. विशाखा देशमुख, डाॅ. प्रीतम धुमाळ यांचाही सन्मान करण्यात आला. स्वच्छता कर्मचारी सविता जगतकर, मनिषा राऊत, संगीता गायकवाड, राजश्री धोकटे यांचा साडी- चोळी देऊन तर परिचारिका सुवर्णा कोंडेकर, अर्चना जगतकर, राजेश्वरी गोस्वामी, अर्चना ढाकणे, सारिका मुंडे, प्रतिभा हनवटे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सेवा यज्ञात जेवणाचा डबा घरपोच देणारे तसेच विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारे कार्यकर्ते यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन सुनिता पोखरकर यांनी केले.

मुंडे भगिनींना मिळताहेत सर्व सामान्यांचे आशीर्वाद

स्व. प्रमोद महाजन यांची पुण्यतिथी ३ मे पासून सुरू केलेले हे सेंटर मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी पर्यंत म्हणजे ३ जून पर्यंत चालविण्यात आले. रूग्णसंख्या घटल्याने आता ते तात्पुरते बंद करण्यात आले आहे. सेंटर मधून सुमारे दीडशेहून अधिक रूग्ण ठणठणीत बरे होऊन सुखरूप घरी परतले. यावेळी डाॅ. वंगे, डाॅ. शालिनी कराड, दत्ताप्पा इटके, राजेश देशमुख, जुगलकिशोर लोहिया, निळकंठ चाटे, जयश्री मुंडे, अरूण पाठक, नरेश पिंपळे, डाॅ. दंडे, लक्ष्मीकांत कराड आदींनी आपले अनुभव कथन केले. सेवा यज्ञातून झालेली सेवा हिच खरी मुंडे साहेबांना आदरांजली आहे. सर्व सामान्य जनतेचे दोन्ही ताईंना मनापासून आशीर्वाद मिळत आहेत असे या सर्वांनी सांगितले.
••••

Exit mobile version