Site icon लोकाशा-बंब न्यूज

पाच जूनच्या आ. मेटेंच्या मोर्चाला परवानगी नाही ! कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, मोर्चात सहभागी होऊ नका, कायदा हातात घेतल्यास कारवाई करणार – जिल्हाधिकारी


बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लोकांना आवाहन करताना कुठल्याही प्रस्तावित मोर्चात सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे. 5 तारखेला आ. विनायक मेटे यांनी आरक्षणाचा प्रश्न घेऊन मोर्चा काढणार असल्याची भूमिका समोर आलेली आहे. मात्र नागरिकांनी कायदा मान्य करत नियम पाळावेत आम्ही आयोजकांना देखील आवाहन केले आहे जर कुणी कायदा मोडणार असेल तर आम्ही कार्यवाही करू असे म्हटले आहे.
गुरूवारी सायंकाळी येथील नियोजन विभागाच्या सभागृहात जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी सीईओ अजित कुंभार, पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी, तहसिलदार शिरीष उमने यांची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांनी पुन्हा एखदा जिल्ह्यातील नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे. बीड जिल्ह्यातील कोरोनाचा अद्याप धोका टळलेला नाही, मोठ्या शिताफईने जिल्हा प्रशासनाने कोरोनाला आटोक्यात आणण्याचे काम केले आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यास आपल्याला यश येत आहे. मात्र पाच जूनचा मोर्चा निघाला आणि त्या मोर्चात जर मोठी गर्दी झाली तर कोरोनाची संख्या वाढू शकते. सर्वांनी स्वत:चा, स्वत:च्या कुटूंबाचा आणि समाजाचा विचार करावा, त्यामुळेच त्यांनी घराबाहेर पडू नये, मोर्चात सहभागी होवून धोका वाढवू नये, या मोर्चाला आम्ही परवानगी दिलेली नाही, असे असतानाही मोर्चात कोणी सहभागी झाले तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत, असा ईशाराही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

Exit mobile version