Site icon लोकाशा-बंब न्यूज

सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द; मोदी सरकारचा निर्णय

कोरोनामुळे यंदाची सीबीएसईची (CBSE) 12 वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान ​यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.​​ ​​पंतप्रधानांनी आज सायंकाळी राज्ये आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये परीक्षा न घेतल्यास काय पर्याय आहेत, यावर चर्चा करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री १ जून रोजी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात होतं. ​​ ​​या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राजनाथ सिंह उपस्थित होते. शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे कोरोना पश्चातच्या आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. 
मागच्या बैठकीत सीबीएसईची १0 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १२ वीची परीक्षा रद्द केल्याचे आता सर्वोच्च न्यायालयाला 3 जूनला कळविण्यात येणार आहे. ​​परीक्षा रद्द करण्यासाठी विरोधकांनी आवाज उठविला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज देखील परीक्ष रद्द करण्याची मागणी केली होती. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीदेखील काल पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी परीक्षा रद्द करून शाळांद्वारे अंतर्गत गुण देण्याचा पर्याय ठेवला होता.

Exit mobile version