Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्याला मोठा दिलासा; पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत मोठी घसरण


बीड, दि.1 (लोकाशा न्यूज) : जून महिन्याच्या सुरुवातीलाच बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे, पंधरा दिवसापासून सुमारे पाचशेच्यावर असलेला कोरोनाबाधिताच्या आकड्यात मोठी घसरण झाली आहे. दि.1 जून रोजी जिल्ह्यात केवळ 361 कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आरोग्य विभागाला 3791 जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले, त्यातून केवळ 361 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत, पॉझिटिव्हमध्ये बीड 70, अंबाजोगाई 30, आष्टी 60, धारूर 17, गेवराई 24, केज 44, माजलगाव 29, परळी 12, पाटोदा 29, शिरूर 28, वडवणी 18 अश्या रुग्णांचा समावेश आहे.

Exit mobile version