दोन लाखाच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला विसर!
दोन लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी त्वरित करा – आ. नमिता मुंदडा, रेग्युलर पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यानांही प्रोत्साहनपर 50 हजाराचे अनुदान तात्काळ देण्याची केली मुख्यमंत्रांकडे मागणी
बीड, दि. 31 : जिल्ह्यातील दोन लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असलेल्या कर्जदारांना अद्यापही कर्ज माफी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळत नाही . दोन लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यानांही कर्ज माफी दिली जाईल असे शासनाने जाहीर केले होते . तसेच रेग्युलर पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यानां प्रोत्साहनपर अनुदान ५०,००० / – ( पन्नास हजार ) रुपये देण्याबाबत शासनाने घोषणा केली होती . परंतु त्याची अमलबजावणी अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही . तरी दोन लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी त्वरित करावी व वेळेवर पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान त्वरित देण्याबाबत निर्णय घ्यावा , अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.