Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हा 15 जुनपर्यत लॉकडाऊन; केवळ अत्यावाश्यक सेवा सुरू

बीड, दि. 31 (लोकाशा न्यूज) : जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यात दि.1 जून रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 15 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय क्षेत्राबरोबरच इतर काही अत्यावाश्यक सेवांना परवानगी दिली आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी दि.31 मे रोजी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील औषधालये, दवाखाने, निशान क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्ला, फार्मास्युटिकल कंपन्या व इत्तर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा सुरू राहतील. तर अत्यावाश्यक सेवेत मोडणारे दुध विक्रीस तीन तासाचा वेळ देण्यात आला असून केवळ प्रत्येक दिवशी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत सुरु राहील. याबरोबरच दि. 1 जून ते 15 जून या कालावधीत जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेत मोडणारे किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीचे दुकाने, बेकरी आदींना दररोज चार तासाचा वेळ दिला असून केवळ सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत हे दुकाने सुरू ठेवता येतील तर शनिवारी व रविवारी पूर्णपणे बंद राहतील. गॅस वितरण दिवसभर सुरु राहिल, सर्व बँक, ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज शासनाच्या नियमीत वेळप्रमाणे पूर्णवेळ सूरु राहतील. शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे 25 % उपस्थितीत सुरु राहतील. लसीकरणा करीता 45 वर्षावरील ज्या व्यक्तीना मेसेज आला आहे. त्यांनाच लसीकरणाचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल.15 जुनपर्यत लॉकडाऊन; अत्यावाश्यक सेवा तीन तास सुरू

कृषी दुकाने, रेशन दुकानास परवानगी

कृषी व्यवसायाशी संबंधित बि – बियाणे, खते, औषधे यांची जी दुकाने आहेत त्या दुकानदारांना आलेले बि-बियाणे, खते, ओषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल. तसेच कृषि विक्रेत्यांना शेतकर्‍यांना बि-बियाणे, खते, औषधे विक्रीस सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत परवानगी असेल. हे दुकाने शनिवार व रविवार सुध्दा विहीत वेळेत चालु राहतील. कृषी उत्पन्न बाजार समित्या सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेतच सुरु राहतील, जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांना सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेतच लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील. दुकानांना पुरवठा केल्या जाणान्या वस्तूंच्या वाहतूकीवर निर्बंध असणार नाहीत, परंतु दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही

Exit mobile version