Site icon लोकाशा-बंब न्यूज

पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद अध्यक्षांची वचनपुर्ती, शिवकन्या सिरसाट यांच्या प्रयत्नांमुळे झेडपीच्या आरोग्य विभागाला सात अत्याधुनिक अ‍ॅम्बुलन्स मिळाल्या


बीड, प्रतिनिधी :- कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील रूग्णांसाठी रूग्णवाहीकांची कमतरता भासत होती. हा प्रश्‍न जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजी सिरसाट यांनी नियोजन समितीच्या बैठकीत वारंवार मांडला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सात अत्याधुनिक अ‍ॅम्बुलन्स दिल्या आहेत. या अ‍ॅम्बुलन्सचे शनिवारी (दि.29) मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
कोरोना महामारीच्या कठीण काळात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ‘जिथे कमी, तिथे मी’ हे धोरण अवंलबले होते. कोविड संसर्गाचा स्फोट झालेला असतानाही सर्व रूग्णांना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे व त्यांची यंत्रणा परिश्रम घेत होती. जेव्हा रूग्ण वाढले आणि बेड कमी पडू लागले त्यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकारी, डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणांच्या बैठका घेऊन, ते सुचवतील तेवढा निधी देऊन जास्तीत जास्त रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान ग्रामीण भागात कोरोना महामारीचा स्फोट झाला आणि रूग्णांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी रूग्णवाहीकांची संख्या अपुरी पडू लागली. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, शिवाजीराव सिरसाट यांनी बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अ‍ॅम्बुलन्सची संख्या वाढवण्याचा प्रश्‍न उपस्थित केला. नुसता उपस्थितच केला नाही तर तो वारंवार लावूनही धरला. अत्याधुनिक सोय सुविधा असलेल्या अ‍ॅम्बुलन्सची संख्या वाढवली तर ग्रामीण रूग्णांना वेळेत उपचार मिळतील म्हणत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे प्रश्‍न लावून धरला. जिल्हा परिषद अध्यक्षांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून अंबाजोगाईसाठी नवीन 7 अत्याधुनिक अ‍ॅम्बुलन्स मिळाल्या आहेत. घाटनांदुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि.29) जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांच्या हस्ते अ‍ॅबुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवाजीराव शिरसाट, विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र वालेकर, सरपंच ज्ञानोबा जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी बालासाहेब लोमटे, वैद्यकीय अधिकारी विलास घोळवे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. तत्पपुर्वी रूई धारूर, मोहखेड येथेही अ‍ॅम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले.

चौकट…
जिल्ह्याला नविण 25 अ‍ॅब्मुलन्स देणार
जिल्हा नियोजन समिती बैठक आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे प्रयत्न आणि पाठपुरावा करून 7 अत्याधुनिक अ‍ॅब्मुलन्स मंजूर करून घेतल्या. याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना अ‍ॅम्बुलन्स मिळाव्यात यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आपण प्रयत्न करणार आहोत. सर्व 25 प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक अ‍ॅम्बुलन्स मिळाल्या तर ग्रामीण भागातील रूग्णांची मोठी गैरसोय दुर होणार आहे.
-शिवकन्या शिवाजीरा शिरसाट, जि.प.अध्यक्षा, बीड.

Exit mobile version