Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमध्ये सराफा दुकानाला आग लावण्याचा प्रयत्न, सीसीटीव्हीत सर्व दृश्य झाले कैद

बीड: येथील हिरालाल चौकात एका सराफा दुकानाला आग लावल्याचा प्रकार शनिवारी(दि.२९) पहाटे तीन वाजता घडला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
सुहास गणेशराव बेदरे यांचे हिरालाल चौक परिसरात बेदरे ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास या दुकानाला आग लावण्यात आली. दुकानाच्या शटरने पेट घेतला. आगीचे लोळ पाहून नागरिकांनी धाव घेतली. दरम्यान, जागेच्या वादातून ही आग लावल्याचा संशय असून एक व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आग लावताना दिसत आहे. पेठ बीड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग वेळीच नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Exit mobile version