बीड, दि. 23 : धारूर तालुक्यातील उमदे व्यक्तिमत्त्व आणि भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते महादेव अण्णा बडे यांचे अकाली निधन व्यथित करणारे आहे.डोंगरपट्ट्यातील ऊसतोड मजुरांना आधार देणारा लोकनेते मुंडे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून महादेव अण्णा परिचित होते.त्यांच्या निधनाने आम्ही एका प्रामाणिक कार्यकर्त्याला मुकलो आहोत, आशा शब्दत शोक व्यक्त करत खासदार प्रीतमताईंनी स्व.महादेव अण्णा बडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.