Site icon लोकाशा-बंब न्यूज

तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक बाधा होण्याची शक्यता, जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली बालरोग तज्ञांची टास्क फोर्स


बीड, दि. 23 : राज्य शासनाने करोना विषाणूचा ( कोव्हीड १ ९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८ ९ ७ दिनांक १३.०३.२०२० पासून लागू करून खंड १ , ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे . त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात ( कोव्हीड १ ९ ) नियंत्रण आणण्यासाठी व त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत . तसेच ज्याअर्थी बीड जिल्ह्यात कोव्हीड .19 कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दैनंदिन कोरोना बाधीत रुग्णसंख्येत मोठया प्रमाणावर वाढ झालेली आहे . कोरोनाच्या दुस -या लाटे दरम्यान लाहन मुले देखील कोरोना बाधित झालेले आहेत . वैद्यकीय तज्ञांनी कोरोना संसर्गाची तिसरी लाट लवकरच येत असल्याची धोक्याची सुचना दिल्या असुन त्यामध्ये लहान मूले जास्त प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तवली आहे . त्यास्तव लहान मुलांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तिस – या लाटेस पूर्ण क्षमतेने तयार हाणेकामी वैद्यकीय तज्ञांची टास्क फोर्स स्थापन करणे आवश्यक आहे . त्याअर्थी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , बीड यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लहान मुलांचे कोवीड -19 वरील उपचार , आस.सी.यु. व्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणेकामी , साथरोग प्रतिबंध कायदा १८ ९ ७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या अधिन राहून मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार बीड जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत खालीलप्रमाणे बालरोग तज्ञ यांची टास्क फोर्स नियुक्त करीत असल्याचे याव्दारे आदेशीत करीत आहे . यामध्ये डॉ.संभाजी चाटे बालरोग विभाग , प्रमुख स्वारातीग्रावेम अध्यक्ष 9307458212 अंबाजोगाई 12 डॉ.राम देशपांडे वर्ग -1 बालरोगतज्ञ , जि.रु.बीड 9422240879 3 डॉ . अनुराग आयएमए अध्यक्ष , बीड समन्वयक 9373437332 पांगरीकर डॉ . पी.सी. तावडे आय ए पी अध्यक्ष , बीड सदस्य 8975922007 5 डॉ.सचिन आंधळकर बालरोगतज्ञ कुटीर रुग्णालय नेकनुर सदस्य 9422743127 6 डॉ.शंकर काशिद बालरोगतज्ञ , जि.रु.बीड सदस्य 9421588200 7 डॉ.रमेश लोमटे बालरोगतज्ञ स्वारातीग्रावेम , अंबाजोगाई सदस्य 9561950831 सदस्य सचिव 4 Scanned by TapScanner उपरोक्त वैद्यकीय तज्ञ यांनी जिल्हयातील बालरोग तज्ञ , डॉक्टर्स , नर्सेस , आरोग्य कर्मचारी व सर्वेक्षणामध्ये सहभागी कर्मचारी यांना ICMR यांचे प्रोटोकॉलनुसार लाहन मुलांचे कोवीड -19 वरील उपचार , आय.सी.यु. व्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक उपयायोजनांबाबत मार्गदर्शन करावे . वरील प्रमाणे नियुक्त केलेले बालरोग तज्ञ यांना कोरोना विषाणु वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जबाबदारी देण्यात आलेली आहे . यांना आदेशाची अवज्ञा करणा – या कोणतीही व्यक्ती , संस्था , अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी, असे आदेश जगताप यांनी पारीत केले आहेत.

Exit mobile version