Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्याला पंधराव्या वित्त आयोगातून आणखी 29 कोटी आले, निधी झेडपी अध्यक्षांच्या मंजूरीनंतर ग्रामपंचायतींना होणार वर्ग


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार पंधराव्या वित्त आयोगातून निधी देतो, त्यानुसार मागच्या दोनच दिवसांपुर्वी बीड जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगातून आणखी 29 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत, अशी माहिती झेडपीच्या ग्रामपंचायत विभागाचे डेप्टी सीईओ दत्तात्रय गिरी यांनी दिली आहे. झेडपीच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांच्या मंजूरीनंतर सदर निधी विकास कामांसाठी ग्रामपंचायतींना वर्ग केला जाणार आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार राज्य सरकारमार्फत पंधराव्या वित्त अयोगातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी देतो. यापैकी 80 टक्के निधी ग्रामपंचायतीमधील विकास कामांवर खर्च केला जातो, तसेच 10 टक्के निधी जिल्हा परिषदेला तर उर्वरित दहा टक्के निधी पंचायत समितीला दिला जातो, मागच्या वर्षी पंधराव्या वित्त आयोगातून बीड जिल्ह्याला दोन वेळा 49 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला होता. तर यावर्षी एप्रिलमध्येही 49 कोटी रूपये बीड जिल्ह्याला देण्यात आले होते. तर मागच्या दोन दिवसांपुर्वीच बीड जिल्ह्याला पंधराव्या वित्त आयोगातून आणखी 29 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत, अशी माहिती झेडपीच्या पंचायत विभागाचे डेप्टी सीईओ दत्तात्रय गिरी यांनी दिली आहे. गावची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ लक्षात घेवून हा निधी दिला जातो,  त्यानुसार झेडपीच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांच्या मंजूरीनंतर हा निधी वितरीत केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सिरसाट यांच्या कार्यकाळाही बीड जिल्हा परिषदेला मोठा निधी प्राप्त होत आहे. यामुळेच ग्रामीण भागातील विकास कामांना आणखी गती मिळणार आहे.    

Exit mobile version