बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या पॅकिंग सील 68 हजार कुंटल पुरवठ्याची मागणी आहे राज्य बियाणे महामंडळ महाबीज व इतर खाजगी कंपन्यांकडून केला जातो यामध्ये महाबीज चा वाटा महत्त्वाचा असतो पण महाबीज ने केवळ दहा हजार क्विंटल बियाणे जिल्ह्यासाठी पुरवठा केले आहेत मात्र उर्वरित बियाण्यांचा पुरवठा महाबीज ने अद्याप पर्यंत केलेला नाही बीड जिल्ह्यात कपाशीच्या पिकाबरोबरच सोयाबीनचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते पावसाळ्यापूर्वीच अतिरिक्त मागणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बियाणे महामंडळाचे अध्यक्ष व सचिव तसेच एमडी राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे
बीड जिल्ह्यात कपाशीच्या पिकाबरोबरच सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणात होत असते बीड जिल्ह्यासाठी 68 हजार कुंटल बियाण्यांची मागणी आहे हे बियाणे महाराष्ट्र बियाणे महामंडळ महाबीज व इतर खाजगी कंपन्यांकडून पूर्ण केली जाते मात्र यावर्षी महाबीज कडून केवळ दहा हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे उर्वरित बियाण्यांचा पुरवठा महाबीज ने तात्काळ करावा जेणेकरून पावसाळ्यापूर्वीच शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करता येतील याबाबत बियाणे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन बीड जिल्ह्यासाठी सोयाबीन बियाण्यांचा अतिरिक्त पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली होती त्यानुसार माजी मंत्री क्षीरसागर यांनी बियाणे महामंडळाची एमडी राहुल रेखावार तसेच महामंडळाचे अध्यक्ष सचिव यांना तात्काळ संपर्क साधून जिल्ह्यासाठी अतिरिक्त मागणीचे बियाणे पुरवठा करण्यात यावी अशी मागणी केली आहे याबाबत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन ही मागणी तात्काळ पूर्ण केली जाईल असेही माजीमंत्री क्षीरसागर यांनी सांगितले आहे