बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : इंडियन फारमर्स फर्टिलायझर लिमिटेड कंपनीने 20 मे रोजी इफको डीएपी/एनपीके/एनपीएस खताची एमआरपी जाहिर केली आहे. त्यानुसार एनपीकेची 10:26:26 ची पन्नास किलो खताची बँग 1175 रूपयांना मिळणार आहे. तसेच एनपीके 12:32:16 ची पन्नास किलोची एक बॅग 1185 रूपये, एनपीएस 20:20:0:13 च्या खताची पन्नास किलोची एक बॅग 975 रूपयांना तर डीएपी खताची पन्नास किलोची एक बॅग 1200 रूपयांना मिळणार आहे. दरम्यान ऐन पेरणीच्या तोंडावर खताचे भाव कमी केल्याबद्दल केंद्र सरकारचे शेतकर्यांमधून आभार मानले जात आहे.
इंडियन फारमर्स फर्टिलायझरने खतांचे नवे दर केले जाहीर
