Site icon लोकाशा-बंब न्यूज

दुसर्‍या दिवशीही नियम तोडणार्‍यांना एसपींनी अद्दल घडविली, 2889 जणांवर खटले दाखल तर पावणे सात लाख रूपयांचा दंडाही केला


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : संचारबंदीत नियम न पाळणार्‍यांना पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी दुसर्‍या दिवशीही मोठा दणका दिला आहे. त्यांच्या आदेशाने जिल्ह्यात 2889 जणांवर खटले दाखल करून त्यांच्याकडून तब्बल सहा लाख 88 हजार 900 रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. एसपींच्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणली आहेत.

दि.20 मे 2021 रोजी जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत – पोलीस ठाणे यांनी तसेच जिल्हा वाहतूक शाखा यांच्याकडून तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणार्‍यांवर 1192 खटले दाखल करून 3,35,700 रु . दंड त्यांच्याकडून आकारण्यात आला आहे. विनाकारण फिरणारे , पोलीसांच्या सुचना न मानणारे , अवैध प्रवाशी वाहतुक करणारे , लॉकडाऊनच्या कालावधीत वाहनाच्या परवानगी पेक्षा जास्त प्रवाशी वाहतुक करणारे, वाहनांचे नियम न पाळणारे अशा 1697 व्यक्तींवर जिल्ह्यात खटले दाखल करून 3,53,200 / रूपये दंड त्यांच्याकडून आकारण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून दि.15-05-2021 ते 25-05-2021 या कालावधीत कडक निबंध लावण्यात आले आहेत . तरी विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा. नियमबाह्य प्रवासी वाहतुक करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. लसीकरणासाठी रूग्णालयात जाणारे व्यक्तींनी नियम पाळावेत. पोलीस प्रशासनाकडून बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी केले आहे.

Exit mobile version