Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्यावर अन्याय होता कामा नये, लातूरप्रमाणेच बीड जिल्ह्यातही “अ‍ॅम्फोटेरिसिन बी’ इंजेक्शन उपलब्ध करून द्या, आ. मुंदडांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी


बीड, दि.21 (लोकाशा न्यूज) : कोरोनाच्या भयाणक अशा परिस्थितीतही राज्य सरकारमधील सत्ताधारी राजकारण करताना दिसून येत आहे. कधी लसीच्या वाटपात तर कधी इंजेक्शनच्या साठ्यामध्ये राजकारण केले जात असल्याचे पहायला मिळत आहे. याचा त्रास मात्र सध्या सर्वसामान्य रूग्णांना सहन करावा लागत आहे. लातूरप्रमाणेच बीड जिल्ह्यातही अ‍ॅम्फोटेरिसिन बी’ हे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी एका पत्राव्दारे आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना केली आहे.
अ‍ॅम्फोटेरिसिन बी’ हे इंजेक्शन नोंदणीकृत खजगी रुग्णालयांना वितरीत करण्यासाठी लातूर जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक, लातूर व विलासरावजी देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर. येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे सदर इंजेक्शनचे बीड जिल्ह्यात नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांना न्यायिक पद्धतीने वाटप करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासोबत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तरी अ‍ॅम्फोटेरिसिन बी’  हे नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांना वाटप करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई  येथे उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे केली आहे.
—–
नेकनूर येथील रूग्णालयात अधिक
प्रमाणात लसी उपलब्ध करून द्यावी
नेकनूर, येथील रुग्णालयामध्ये कोरोना लसीकरणासाठी लस कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. प्रथमिक आरोग्य केंद्राला जेवढा लस पुरवठा होतो जवळपास तेवढाच लस पुरवठा होत आहे. प्रत्यक्षात नेकनूर येथे मोठी बाजारपेठ आहे व गावची लोकसंख्या व आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या पाहता नेकनूर येथे जास्त लस पुरवठा करणे आवश्यक आहे. तरी नेकनूर व परिसरातील गावांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे नेकनूर येथील रुग्णालयाला जास्त प्रमाणत लस पुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version