Site icon लोकाशा-बंब न्यूज

लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील ठोक कृषी विक्रेत्यांना सकाळी 11 ते सांय 7 यावेळेत परवानगी, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सूचना मान्य

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील खते बि – बियाणे फर्टीलायजर दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे केली होती त्यानुसार ठोक कृषी विक्रेत्यांना दि 21 ते 25 मे दरम्यान सकाळी 11 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे

सुदैवाने या वर्षी पावसाळी हंगाम हा चांगला होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून या वर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, तुर, मका, उडीद, मुग आदी पिकांची लागवड होणार असून जुन महिन्यात वेळेवर पाऊस पडेल असा अंदाज
असून शेतकऱ्यांना बि – बियाणे व खते खरेदीसाठी बीड जिल्ह्यातील खतांची दुकाने उघडी ठेवणे गरजेचे असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बि -बियाणे व खते खरेदी करण्यासाठी वेळ मिळेल या बाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी असून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात यावी.अशी सूचना व मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे केली होती त्यानुसार आजच जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन ही मागणी मंजूर केली आहे आता दि 21 ते 25 मे दरम्यान सकाळी 11 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत कृषी विक्रेत्यांना कार्यलयीन कामकाज व ठोक कृषी निविष्ठा विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे

खरीप हंगामाचा कालावधी पाहता व पेरणीचा काळ हा जवळ येत असून शेतकऱ्यांना बि – बियाणे व खते खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता या बाबत वरील प्रमाणे निर्णय घेण्यात यावा अशी आग्रहाची मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना निवेदनाद्वारे केली होती

Exit mobile version