Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड-साक्षाळपिंप्री रस्त्यासाठी 3 कोटी 88 लाखाचा निधी, आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या मागणीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दखल


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : बीड शहरातील करपरा नदीपासून खापरपांगरी-पारगाव शिरस-साक्षाळपिंप्री या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय सीआरआयएफमधुन 3 कोटी 88 लाख रूपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. सदर रस्ता अत्यंत खराब असल्याने या रस्त्याच्या कामासाठी तातडीने निधी द्यावा अशी मागणी बीडचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी लोकनेते खा.शरदचंद्र पवार , खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 3 कोटी 88 लाख रूपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी मंत्री नितीन गडकरी व सर्वांचे आभार मानले आहेत.
बीड शहरातील करपरा नदीपासून खापरपांगरी-पारगाव शिरस-साक्षाळपिंप्री हा रस्ता खराब झाल्याने सदर रस्ता काम करण्यात यावे अशी मागणी या भागातील नागरीकांकडून सातत्याने करण्यात येत होती. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मागणीची तातडीने दखल घेत बीड शहरातील करपरा नदी-खापरपांगरी-पारगाव सिरस-साक्षाळपिंप्री या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 3 कोटी 88 लाख रूपयाचा निधी मंजुर केला आहे. सदर निधी मंजुर करण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसार यांचा पालकमंत्री तथा सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू होता. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बीड मतदार संघात विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत असल्याने नागरिकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे. लोकनेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील करपरा नदी ते खापरपांगरी-पारगाव शिरस-साक्षाळपिंप्री या रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 88 लाख रूपये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुर केल्याबद्दल खा.शरदचंद्रजी पवार साहेब, नितीन गडकरी यांचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील नागरीकांच्या वतीने आभार मानले आहेत.

अंबिका चौक ते करपरा नदीपर्यंत
रस्त्यासाठ आणले 6 कोटी
शहरातील अंबिका चौक ते करपरा नदीपर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सहा कोटी रूपये मंजुर करून घेतले. या रस्त्याची प्रशासकीय पातळीवरील कार्यवाही पुर्ण झाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पुर्ण करून लवकरच सिमेंट रस्ता व नाली बांधकामाच्या कामास सुरूवात होणार आहे.

Exit mobile version