Site icon लोकाशा-बंब न्यूज

रूग्णांना बेड,ऑक्सिजन,इंजेक्शन व औषधांची कमतरता भासता कामा नये, आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या जिल्हा रूग्णालय प्रशासनाला सूचना



बीड (प्रतिनिधी):- बीड जिल्हा रूग्णालयासह शहरातील व ग्रामीण भागातील रूग्णालय, खासगी कोव्हिड रूग्णालय, कोव्हिड सेंटर येथे रूग्णांना बेड, आवश्यक त्या ठिकाणी ऑक्सिजन, इंजेक्शन व औषध गोळ्यांची कमतरता भासता कामा नये. रूग्णांच्या नातेवाईकांकडून रूग्णांवरती योग्य प्रकारे उपचार होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत रूग्णंना तातडीने सेवा मिळाल्या पाहिजेत. कोरोनामुळे वाढता मृत्यूदर कसा कमी करता येईल यावर जिल्हा रूग्णालय प्रशासन यांनी लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. कोव्हिड रूग्णांबाबत अतिसंवेदनशिलपणा दाखवा, रूग्णांना कुठल्याही बाबींची कमतरता भासू देवू नका अशा सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णालय येथील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना व रूग्णांच्या उपचाराबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत केल्या आहेत.
बीड जिल्हा रूग्णालयात सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व रूग्णांच्या उपचाराबाबत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गित्ते यांच्यासह वैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत रूग्णांना सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने त्यावर गांभीर्याने दखल घेवून तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हा रूग्णालय प्रशासनाला करत त्यांनी दिरंगाई करणार्‍या काही अधिकारी, कर्मचार्‍यांनाही चांगलेच झापले. कोरोना संसर्गाविषयी आपल्या सर्वांची तितकीच नैतिक जबाबदारी, या महामारीला आपण गांभीर्याने घेतले पाहिजे. सर्वांनी मिळून कोरोना संकट दुर करण्यासाठी सहकार्य करावं, नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी आ.संदिप क्षीरसागर यांनी केले आहे. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक गित्ते, डॉ.राठोड, डॉ.हुबेकर, अजय सुरवसे, अशफाक इनामदार, नगरसेवक रमेश चव्हाण, पंकज बाहेगव्हाणकर यांच्यासह आदी जण उपस्थित होते. 

Exit mobile version