Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात ‘म्युकर मायकोसीस’ चे रूग्ण वाढू लागले,आजारावर उपचार करण्यासाठी इंजेक्शन मिळत नसल्याने आ. नमिता मुंदडांनी ना. टोपे अन् ना. देखमुखांकडे केली तक्रार


अंबाजोगाई, दि. 20 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात म्युकर मायकोसीसचे रूग्ण वाढत चालले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणारे इंजेक्शन मिळत नाही, म्युकर मायकोसीसीच्या उपचारासाठी लागणार्‍या इंजेक्शनचा साठा जिल्ह्यात तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी ना. राजेश टोपे आणि ना. अमित देशमुखांकडे केली आहे.
अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबरोबरच जिल्ह्यात इतर रूग्णालयांमध्ये ’ म्युकर मायकोसीस ’ या गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील शस्त्रक्रीया सदर रुग्णालयातच होतात, परंतु या आजारासाठी आवश्यक असणारे Aाहिेींशीळलळप इ ङळिेीेारश्र 50ास हे इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध असायला पाहिजे, परंतु हे इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध नाही व सदर इंजेक्शन हे मराठवाड्यातील डीलरकडे व मेडिकल स्टोअरलाही उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. तरी म्युकर मायकोसीस या गंभीर आजारासाठी लागणारे Aाहिेींशीळलळपइ ङळिेीेारश्र 50ास इंजेक्शन स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह जिल्ह्यात उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही व रुग्णांवर व्यवस्थित उपचार होतील, असे आ. नमिता मुंदडांनी आपल्या पत्रात म्हटले आहे

Exit mobile version