Site icon लोकाशा-बंब न्यूज

भाटवडगावमधील मतीमंद मुलीवर बलात्कार,तक्रारीची दाखल न घेणार्‍या पोलिसांना अ‍ॅड हेमा पिंपळेंनी वठणीवर आणले, अखेर ‘त्या’ नराधमावर गुन्हा दाखल



बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील 18 वर्षीय मतीमंद मुलीशी गावातीलच एका लग्न झालेल्या व पाच मुले असलेल्या इसमाने बलात्कार केला, त्यातुन ती पाच महिन्यांची गर्भवतीही राहीली, यासंदर्भात तिची तक्रार संबंधित पोलिस स्टेशनमध्ये घेतली नाही, त्यानंतर त्या पीडितेच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड हेमा पिंपळे यांच्याशी संपर्क साधून सर्व आपबिती सांगितली. त्यावर पिंपळेंनी थेट एसपी ऑफिस गाठून अधिक्षक राजा रामा स्वामी यांची भेट घेवून सदर पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी केली, त्यानंतर एसपींनी सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यांचे आदेश येताच माजलगाव ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी सदर आरोपीविरोधात कलम 376 (2) (1), 376 (2), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अ‍ॅड हेमा पिंपळेंनी घेतलेल्या या आक्रमक पावित्र्यामुळे सदर पीडितेला न्याय मिळाला आहे.


Exit mobile version