Site icon लोकाशा-बंब न्यूज

राजीव सातव यांच्या निधनाने लोकनेते मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला,पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोक भावना

मुंबई । दिनांक १६।
काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या निधनाने लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

सर्व सामान्य समाजासाठी धडपडणारा एक तरूण उमदा युवा नेता राजीव सातव यांच्या रूपाने आज आपण गमावला आहे. ज्या व्यक्ती आपले आयुष्य कष्टात घालवतात, त्यांना एका उंचीवर पोचविण्यासाठी अनेक हात लागतात आणि तो जेव्हा एका उंचीपर्यंत पोचतो तो अनेक जीवनांना स्पर्श करत असतो अशा प्रवासाचे उदाहरण असलेल्या राजीव सातव यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. सातव आणि आमच्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यांच्या जाण्याने काॅग्रेसने एक उमदा नेता गमावण्या बरोबरच मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी मनापासून दुःख व्यक्त करते, त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी शोक भावना व्यक्त केल्या.
••••

Exit mobile version