Site icon लोकाशा-बंब न्यूज

ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना लुटले , केज बीड रोडवरील सांगवी पाटीजवळील घटना

केज दि .16 – अमोल ट्रॅव्हल्सच्या ( एम . एच .23 ए.यू .2907 ) डिकीतून प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांकडील ऐवज 2 चोरट्यांनी लंपास केला . केज तालुक्यातील सांगवी पाटीनजीक 14 मे रोजी पहाटे दीडच्या सुमारास घडली . प्रशांत दादाराव मिसाळ ( रा . फुले नगर , केज ) यांच्या बॅगेतील घड्याळ , बँक पासबुक , एटीएम कार्ड व पुस्तके असा 10 हजारांचा ऐवज , विजय पंडित बिडवे ( रा . बंकट गल्ली , अंबाजोगाई ) यांच्या बॅगेतून दीड तोळे सोन्याचे गंठण , चार शर्ट , पॅन्ट जोड असा 65 हजारांचा ऐवज , अक्षय दादाराव चेवले ( रा . सिडको नांदेड ) यांचा 5 हजारांचा मुद्देमाल असा एकूण 80 हजारांचा मुद्देमाल लंपास केला . ट्रॅव्हल्स चालक वसंत ढवळे ( रा . धनगरजवळका ता.पाटोदा ) यांच्या फिर्यादीवरुन चोरट्यांविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा नोंद झाला .

Exit mobile version