Site icon लोकाशा-बंब न्यूज

पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून मान्यता देऊन सुविधा उपलब्ध करा,-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकशाहीच्या चार आधारस्तंभ पैकी एक आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेला कोरोना काळात सहकार्य करण्याची आवश्यकता आहे पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून मान्यता देऊन विमा संरक्षण देऊन सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच लसीकरणासाठी प्राधान्यक्रम देण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपुर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची कोविड-१९ त्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमांद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनीधी यांना फ्रंटलाईन वर्कर्स चा दर्जा देवून त्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांचे लसीकरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.कोरोना काळात अनेक तरुण पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत,पत्रकार केवळ ठराविक मानधनात काम करत असतात त्यांना शासकीय सुविधा किंवा शासनाचे मानधन नसते त्यामुळे विमा संरक्षण आवश्यक आहे,सध्या वार्तांकणासाठी अनेक पत्रकार अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊन काम करत आहेत त्यांना लसीकरण साठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशा विंनती चे निवेदन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे

Exit mobile version