बीड, .१० : कोविड -१ ९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयात कोविड १ ९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे , • १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांसाठी कोविड लसीकरण सत्र तालुक्याच्या ठिकाणी सुरु असुन या वयोगटाकरीता ८७०० कोविशील्ड लस लससाठा प्राप्त झाला असुन दररोज प्रतिदिन २०० डोसेस याप्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे . १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांसाठी खालील ठिकाणी लसनिहाय सत्र आयोजीत करण्यात आले आहेत .
अ.क्रं | कोविशील्ड लस असणारे केंद्र १ ) स्वा.रा.ती.वै.म , अंबाजोगाई २ ) चंपावती प्राथमिक शाळा , बीड ३ ) पहिला मजला , उपजिल्हा रुग्णालय , केज | जि.प.जुनी इमारत , गेवराई औष्णिक विद्युत केंद्र , परळी ग्रामीण रुग्णालय , आष्टी कोवॅक्सीन असणारे केंद्र | ७ ) चंपावती प्राथमिक शाळा , बीड ८ ) ग्रामीण रुग्णालय , धारूर ९ ) ग्रामीण रुग्णालय , माजलगाव | १० ) ग्रामीण रुग्णालय , पाटोदा ११ ) प्राथमिक आरोग्य केंद्र , शिरूर १२ ) प्राथमिक आरोग्य केंद्र , वडवणी . १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांसाठी मंगळवार दि .११ / ५ / २०२१ पर्यंतची नोंदणी पुर्ण झाली असुन दि .१२ / ५ / २०२१ रोजीच्या लसीकरण सत्राकरीता सोमवार १० / ५ / २०२१ रोजी सांयकाळी ६ वाजता नोंदणी करता स्लॉट ओपन होणार आहे व १३/५/२०२१ पासुनच्या लसीकरण सत्राकरीता लस साठा उपलब्ध असेपर्यंत दररोज दुपारी २ वाजता स्लॉट ओपन केला जाईल तरी १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांनी नोंदणी करुन अपॉइंटमेट नुसार लसीकरण करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले असुन कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांनी अनावश्यक गर्दी टाळावी , कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे .