बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : बीड ग्रामीण पोलिसांनी जुगार्यांना आणखी एक मोठा दणका दिला आहे. तालुक्यातील आहेरवडगाव येथील जुगार अड्डड्यावर छापा मारून जुगार्यांना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात 12 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कारवाईत तब्बल पावणे पंधरा लाख रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे आणि एपीआय उबाळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जुगार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आमेर अब्दुल रशिद बागवान (वय -23 वर्षे, रा.शाहुनगर, सय्यदनगर पांगरी रोड बीड, ईश्वर रामचंद्र जोगदंड (वय -29 वर्षे रा.स्वराज्यनगर बीड, शैलेश सुरेश बावणे (वय -22 वर्षे रा.वत्तारवेस पेठबीड), रोहीत भागवत गायकवाड (वय -31 वर्षे रा.सराफा लाईन पाथरुड गल्ली बीड), निलेश भरत जाधव (वय 25 वर्षे रा.टकारवाडा पेठबीड), महेश दिपकराव आठवले (वय -26 वर्षे रा.मंत्री कॉलनी माळीवेस बीड), वैभव वैजिनाथ डोळस (वय -19 वर्षे रा.माळीवेस एमएसईबी ऑफीस रोड बीड), शंकर उर्फ आदर्श सुरेश डरांगे (वय -25 वर्षे रा.बेगमपुरा, पहाडसींगपुरा विद्यापीठ परिसर औरंगाबाद ह.मु.माळावेस, यादवमला बीड), निलेश धनराज गायकवाड (वय -26 वर्षे रा.धोंडीपुरा, सराफा लाईन पाथरुड गल्ली बीड), बिलाल समशीर पठाण (वय -24 वर्षे रा.शाहुनगर , उमाकिरण परिसर बीड), साहील नरेश गायकवाड (वय -19 वर्षे रा.पाथरुड गल्ली सराफा लाईन बीड) आणि अमोल जगन्नाथ जाधव (रा.लक्ष्मणनगर बीड ( फरार)) या बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील आहेरवडगाव परिसरातील चौरे यांच्या शेतातील अंब्याच्या झाडाखाली तिर्रट नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहिती दखल घेवून पोलिस निरीक्षक संतोष साबळे आणि एपीआय उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीण पोलिसांनी नऊ मे रोजी दुपारी 03.07 वाजता त्या जुगार अड्डड्यावर छापा मारला, यावेळी नगदी 60,600 रूपये , तिर्रट जुगार साहित्य, मोबाईल 2,08,500 रूपये आणि 17 मोटार सायकल (किंमत -12,05,000 रूपये) असा एकूण 14,74,100 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार रमेश दुबाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण ठाण्यात 12 जुगार्यांवर कलम 12 ( अ ) महा.जुगार अधिनियम सह कलम 188,269,270 भादंवी , कलम 51 ( ब ) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम , कलम 17 महा.पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे तालुक्यातील जुगार्यांची धाबे दणाणली आहेत.