बीड, दि.7 (लोकाशा न्युज) ः जिल्ह्यात पाच दिवस (दि.8 मे ते 12 मे 2021) लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या पाच दिवसात जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना किराणा दुकाने, चिकन, मटन विक्रीचे दुकाने, बेकरी व कृषीशी संबंधित आदी पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार व बुधवार (दि.8 मे 12 मे 2021) या दिवशी केवळ सर्व औषधालये, दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण करे, वैद्यकिय विमा कार्यालय, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन वितरण, सैनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा आदी अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना सुरू राहतील. इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत. दि.8 ते 12 मे रोजी जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना किराणा दुकाने, चिकन, मटन विक्रीचे दुकाने, बेकरी व कृषीशी संबंधित आदी पूर्णतः बंद राहतील. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील, तसेच प्रत्येक दिवशी दि.8 ते 12 मे रोजी पर्यंत केवळ पायदळ / गाडीवर / हातगाड्यावर फिरुन दुध, भाजी व फळांची विक्री केवळ सकाळी 7.00 ते 10.00 वाजेपर्यंत व फक्त फळांची विक्री सावकाळी 05.00 ते रात्री 07.00 या वेळेत करता येईल. बैंकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी 10.00 ते दु .12.00 वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील, पेट्रोलपंप व गॅस एजेंसी यांना कंपनीस देयके द्यावी लागतात. तसेच पेट्रोलपंपावर रोख रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होते. करिता पेट्रोल पंप व गॅस एजंसी यांना सदर वेळेत बँकेत जाऊन कामकाज करता येईल. सर्व अधिकारी / कर्मचारी जे कोरोना विषयक कामकाज करत आहेत (उदा. डॉक्टर्स, नर्सस, आरोग्य विभागाचे, महसूल विभागाचे, पोलीस विभागाचे, जिल्हा परिषदेचे इ.अधिकारी / कर्मचारी) ज्यांचेकडे संबंधीत कार्यालय प्रमुखाने दिलेले ओळखपत्र असेल त्यांनाच कार्यालयात ये – जा करण्याची मुभा असेल, दिनांक 08/05/2021 ते 12/05/2021 या कालावधीत निबंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येतील. असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी शुक्रवारी दि.7 मे रोजी काढले आहेत.