Site icon लोकाशा-बंब न्यूज

निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करा, कलेक्टर, एसपी, सीईओंनी रस्त्यावर उतरून नागरिकांना केले आवाहन


बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात कोरोनाचे आकडे वाढत असतानाच गुरुवारी दुपारी बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असे तिन्ही वरिष्ठ अधिकारी थेट रस्त्यावर उतरले. बीड शहराच्या चौकांमध्ये थांबून रस्त्यावर येणार्‍या वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी करत त्यांनी जनतेला निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले.
बीड जिल्ह्यात बुधवारपासून लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यातच बुधवारी काही ठिकाणी पोलिसांकडून लोकांना मारहाणीचे प्रकार घडले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी स्वतः जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आ. राजा आणि सीईओ अजित कुंभार हे रस्तयावर उतरले. त्यांच्यासोबत तहसीलदार शिरीष वमने होते. सहाराच्या चौकात थांबून प्रशासनातील या तीनही वरिष्ठ अधिकार्‍यांनी रस्तयावर येणार्‍या वाहनांची तपासणी केली, रस्त्यावर येणारे लोक अत्यावश्यक कामासाठीच येत आहेत का? याची खात्रीही या अधिकार्‍यांनी यावेळी केली. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आकडा वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडणे अत्यावशक आहे, त्यासाठी लोकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, जे निर्बंध लावले आहेत, ते जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत, त्यामुळे या निर्बंधांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जगताप यांच्यासह एसपी आर. राजा आणि सीईओ अजित कुंभार यांनी केले.

Exit mobile version