Site icon लोकाशा-बंब न्यूज

डोईफोडेचं डोकं फिरलं, म्हणे खाजगी रुग्णालयातील रुग्णांना एक दिवस आड रेमडेसिविर इंजेक्शनचा डोस द्या, काळाबाजार करण्यासाठी ड्रग इंस्पेक्टर डोईफोडेचा अजब फतवा – पटेल, नाईकवाडे

प्रतिनिधी- बीड शहरातील सर्व कोरोना बाधित व संशयित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांना काल ड्रग इंस्पेक्टर रामेश्वर डोईफोडे यांनी ई-मेल पाठवून खाजगी रुग्णालयात दाखल रुग्णांना एक दिवस आड रेमडेसिविर इंजेक्शनचा डोस द्या असा फतवा जारी केला केला. कोरोना बाधित किंवा संशयित रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करण्यात यावेत यासंबंधीच्या गाईडलाईन राज्य शासनाने घालून दिलेल्या आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांना छेद देत ड्रग इन्स्पेक्टर रामेश्वर डोईफोडेने स्वतःच्याच गाईडलाईन काल शहरातील खाजगी रुग्णालयांना जारी केल्या. डोईफोडे यांच्या या संभ्रम निर्माण करणाऱ्या कृतीने रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करावेत असा प्रश्न समस्त खाजगी रुग्णालयातील डॉक्टर मंडळींना पडला आहे. डोईफोडे यांचा हा फतवा पूर्ण जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींसाठी नसून तो फक्त बीड शहरातील डॉक्टरांसाठी किंवा रुग्णालयांसाठी लागू असल्याचेही त्या ईमेलमध्ये सांगण्यात आले आहे. डोईफोडे यांची ही धडपड फक्त रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करण्यासाठीच असल्याचे गटनेते फारुख पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

    दि. 6 मे रोजी खाजगी रुग्णालयांना पाठवलेल्या ईमेल मध्ये ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे यांनी स्पष्ट म्हंटले आहे कि, काल ज्या रुग्णांची नावे रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठवली होती ती नावे दुसऱ्या दिवशीच्या यादीमधून वगळावीत, रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पूर्ण डोस देणे शक्य होणार नाही, तेवढा इंजेक्शनचा साठा जिल्ह्याकडे उपलब्ध नाही. डोईफोडेंच्या अशा अजब फतव्याने खाजगी रुग्णालयातील डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यात घामासान होईल. डॉक्टरच जाणीवपूर्वक आपल्या पेशंटचे नाव रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्याच्या यादीमध्ये टाकत नसल्याची भावना रुग्णांच्या नातेवाईकांची होईल, संबंधित रुग्णांचे नातेवाईक व डॉक्टर असा संघर्ष बीड शहराचे आरोग्य धोक्यात घालण्यास कारणीभूत असेल. हा सर्व प्रकार ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून चालवला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मुजोर डोईफोडेंना आवरावे व त्यांचे रेमडेसिविर बाबतच्या काळा बाजाराचे धंदे बंद करावेत असेही शेवटी गटनेते फारूक पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी पत्रकात म्हटले आहे.
Exit mobile version