Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा. प्रीतमताई एसपींना बोलल्या, वैद्यकिय अधिकार्‍यास झालेल्या मारहाणीची होणार नि:पक्षपाती चौकशी, चौकशीसाठी एसपींनी नेमली त्रिसदस्यीय समिती


बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : पोलिसांकडून काल डॉ. विशाल वनवे यांना मारहाण झाली होती, या मारहाणीचा निषेध करत वैद्यकिय अधिकार्‍यांनी काम बंदचा पावित्रा घेतला, या घटनेची माहिती मिळताच खा. प्रीतमताई मुंडे यांनी थेट पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेविषयी चर्चा केली, या प्रकरणात तात्काळ अ‍ॅक्शन घेवून तीन सदस्यांची समिती नेमून निःपक्षपातीपणे चौकशी केली जाणार असल्याचे आश्‍वासन यावेळी एसपींनी खा. प्रीतमताईंना दिले आहे. तसे चौकशीचे आदेशही त्यांनी सदर समितीला दिले आहेत, सध्याच्या कोरोनाच्या संकटात डॉक्टर आणि पोलिस दोघेही आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, या दोघांचीही समाजाला आज खरी गरज आहे, त्यामुळे हा राजकिय विषय होवू नये, असे आवाहन यावेळी खा. प्रीतमताईंनी केले आहे.

Exit mobile version