Site icon लोकाशा-बंब न्यूज

ममता दिदींच्या जुलूमी राजवटीचा जाहीर निषेध -प्रवीण दरेकर, बीड भाजपातर्फे निषेध आंदोलन

बीड प्रतिनिधी
प. बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला. हिंसाचारात अकरा कार्यकर्त्यांच्ये बळी गेले. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. या रक्तरंजित हिंसाचाराचा निषेध प्रदेश भारतीय जनता पार्टी तर्फे संपूर्ण राज्यभर करण्यात आला. बीड येथे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगर रोड येथील संघर्षयोद्धा जनसंपर्क कार्यालया समोर निषेध आंदोलन करण्यात आले.
दरम्यान दुपारी जिल्हाधिकारी बीड यांना बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेधाचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकीचा निकाल दि.2 मे 2021 रोजी घोषित झाल्यानंतर अवघ्या 24 तासात तेथे सुडाचे राजकारण चालू झाले. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या गुंड कार्यकर्त्यांनी अनेक भाजपा कार्यकर्त्यावर हल्ले करत कार्यकर्त्यांची हत्या केली. त्यांच्या घरांची व भाजपा कार्यालयांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानाला आग लावणे, दुकानांची लुट करणे, महिलांवर अत्याचार करून त्यांना मारहाण करणे असे हिंसक आणि गुंडागर्दीचे प्रकार सुरू केले आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. निवडणूक विजयाचा उन्माद आणि सत्तेची मग्रुरी प्रदर्शित करून राज्यात रक्तरंजित हिंसाचार घडवला आहे. क्रूर व घृणास्पद घटनांमुळे लोकशाहीची मूल्य पूर्णपणे पायदळी तुडवली गेली आहेत. भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्कानुसार भारतीय जनता पक्षाला मतदान करणाऱ्या लाखो नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण असुन त्यांची मालमत्ता व जिवित्वाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाहीला काळीमा फासवणाऱ्या ऐतिहासिक रक्तरंजित हिंसाचाराचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध व्यक्त करत आहे.पश्चिम बंगालला रक्तरंजित इतिहास आहे कम्युनिस्ट पार्टी पासून रक्ताशिवाय तिथे निवडणुका होत नाही ममतादीदींनी तोच पांयंडा पाळत रक्तरंजित इतिहास पुन्हा उघडला. आपल्या लोकशाहीप्रधान देशामध्ये हिंसाचार अभिप्रेत नाही खरं म्हणजे ममतादीदी जिंकल्यानंतर देशभरात त्यांचे कौतुक झाले परंतु अशा घटना बाह्य कृत्यामुळे हा विजय मातीमोल झालेला आहे. आज या देशातील जनता ममता दीदी चा व तृणमूल काँग्रेसचा धिक्कार करत आहे. पश्चिम बंगाल मधील लोकांना हा रक्तरंजित इतिहास पुसला जाईल अशी अपेक्षा होती परंतु तोच रक्तरंजित इतिहास पुन्हा लिहिण्याचे काम कुणी आणि क्रूर तृणमूल काँग्रेसच्या माध्यमातून होत आहे.
लोकशाहीला काळीमा फसवणाऱ्या रक्तरंजित हिंसाचाराचा आणि ममता दीदींच्या जुलमी राजवटीचा भारतीय जनता पार्टीतर्फे जाहीर निषेध करत आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. या निषेध आंदोलनात राम कुलकर्णी, अजय सवाई, सचिन उबाळे , नागेश पवार,विलास बामणे, भूषण पवार, बालाजी पवार,प्रमोद रामदासी,नरेश पवार, विजय गायकवाड, अनिल चांदणे,कपील सौदा,शरद बडगे,पंकज धांडे,महेश सावंत, संभाजी सुर्वे कल्याण पवार आदी सहभागी झाले होते.

Exit mobile version