Site icon लोकाशा-बंब न्यूज

रूग्णांच्या सेवेत आम्ही कधीच कमी पडणार नाहीत – राजेंद्र मस्के, मुंडे भगिणींच्या नेतृत्वात शिरूरमध्ये उभे राहत असलेल्या कोविड सेंटरची मस्केंनी केली पाहणी


शिरूर, दि. 4 (लोकाशा न्यूज) : सध्या कोरोनाचे संकट गंभीर असले तरी लोकनेत्या पंकजाताई आणि खा. प्रीतमताई यांच्या नेतृत्वात आम्ही रूग्णांच्या सेवेसाठी कधीच कमी पडणार नाही, असा विश्‍वास भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बोलून दाखविला आहे.
भाजप राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि
 खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना बाधीत रुग्णांच्या सेवेसाठी स्व.गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान  व शांतीवन सामजिक संस्था आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर कासार येथे 20 आॉक्सीजन बेडसह 100 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. या नियोजित कोविड सेंटरला काल भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भेट दिली, यावेळी त्यांनी या कोविड सेंटरचा आणि शिरूर तालुक्यातील संपूर्ण कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला, सेवा हीच खरी संघटना आहे, त्यामुळे कोरोनाच्या संकटात आम्ही रूग्ण सेवेसाठी कधीच कमी पडणार नसल्याचे यावेळी मस्के यांनी बोलून दाखविले आहे.  यावेळी दिपक काका नागरगोजे, जि. प. सदस्य रामदास बडे, संस्था चालक रामकृष्ण मिसाळ, डॉ. बडजाते, डॉ. बडे, संतोष राख, मधुसूदन खेडकर, नगरसेवक बाजीराव सानप, भागवत बारगजे, प्रकाश बडे, प्रल्हाद धनगुडे, विवेक पाखरे, मच्छिंद्र सानप यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version