Site icon लोकाशा-बंब न्यूज

ठाकरे सरकारला पत्रकारांची आलर्जी आहे का ? बिहार, मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने पत्रकारांना मदत करावी- प्रवक्ते राम कुलकर्णी


अंबाजोगाई दि (प्रतिनिधी )
ठाकरे सरकार राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून सत्ताधाऱ्यांना पत्रकारांची अलर्जी आहे की काय ? असा प्रश्न आता पडला आहे .करोना संकटात फ्रन्ट लाईन वर स्वतःचे जीव धोक्यात घालून पत्रकार काम करतात . शंभरपेक्षा अधिक पत्रकार यांचा मृत्यू झाला .एक रुपयाची मदत सरकारने केलेली नाही . बिहार आणि मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने पत्रकारांना मदत करावी अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे .
प्रसिध्दी साठी दिलेल्या निवेदणात म्हटले आहे कि देशात करोना संकट चालू झाल्या पासून राज्यातील पत्रकार बांधव स्वःताचे जिव धोक्यात घालून अहोरात्र रस्त्यावर उतरून काम करत आहेत . पत्रकारांनी करोना बाबद जनजाग्रती करण्याच काम करतांना प्रशासन आणि जनता आणि सरकार यांच्यात समन्वय ठेवण्याच काम केल आहे . अगदी करोना योद्धे म्हणुन फ्रन्ट लाईन भुमीका त्यांची राहिली . मग प्रिन्ट मिडिया असो किंवा इलेक्टॉनिक्स सर्व पत्रकारांची भुमीका समाज बघत आहे . या लढ्यात काम करतांना राज्यात शंभरावर अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला असून काहींचे संसार उघडयावर पडले आहेत . पत्रकारांना मदत द्यावी आशी मागणी राज्यात पत्रकारांच्या संघटनेनी केलेली आहे . दोन दिवशा पूर्वी जेष्ठ पत्रकार एस .एम . देशमुख यांच्या नेत्रत्वा खाली आत्मक्लेश अंदोलन राज्यात करण्यात आले वारंवार मदतीची मागणी करून सुद्धा ठाकरे सरकारला पत्रकारांची दया येत नसून स्वःता मुख्यमंत्री एका दैनिकाचे संपादक राहिले तरी सुद्धा पत्राकार बांधवाचे प्रश्न तांना दिशत नसून सरकारला पत्रकारांची आलर्जी असल्याचा अरोप कुलकर्णी यांनी केला . वास्तविक पाहता संकटाच्या पार्श्वभुमीवर बिहार आणि मध्यप्रदेश सरकारने पत्रकारांची काळजी घेतांना मृत्यू पश्चात नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची भुमीका घेतली आहे . मात्र ठाकरे सरकार कशामुळे दुर्लक्ष करत हेच कळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे . खर तर सरकारला पत्रकारांची गरज नेहमी लागते . पत्रकार सहकार्य करतात मग सरकार पत्रकारांच्या प्रश्नासाठी हात आखडता का घेते असा सवाल त्यांनी केले आहे . त्यामुळे ठाकरे सरकारने या संकटात सापडलेल्या पत्रकारांच्या कुठूंबीयांना तात्काळ मदत करावी आशी मागणी त्यांनी केली आहे

Exit mobile version