Site icon लोकाशा-बंब न्यूज

‘शिवरामा धन्य तुझी” कळसाचे लाख सेंटरला देणारा ” लोळदगावपुत्र “

शिवरामा धन्य तुझी
कळसाचे लाख  सेंटरला देणारा ” लोळदगावपुत्र “
लोकाशा न्यूज
शिवराम घोडके याची वेगळी ओळख देण्याची गरज नाही , उन्हाळ्यात गावाच्या कडेला समुद्र आणणारा केवळ नदी खोल करत नाही तर वेदना खोल जगतो म्हणूनच गावासाठी गावातच सेंटर उभे करण्यासाठी समोर आलाय , गावच्या अध्यात्मिक एकी साठी मंदिराला १ लाख देणार होता मात्र कोरोनाने गावाला विळखा पडल्याने मंदिर नंतर पाहू अगोदर कोरोनाची समाधी घालू या निश्चयाने या भूमीपुत्राने गावातच सेंटर उभे केले आहे . लोळदगाव च्या या वाघाने गावातच सेंटर उभे करून आपला लढा आपली जबाबदारी उचलली आहे .
  महाराष्ट्र दिनानिमित्त बीड तालुक्यातील लोळदगाव येथे जिल्हा आरोग्य विभाग, मानवलोक अंबाजोगाई आणि फार्मर्स फ्रेंड ऑर्गेनिक प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या माध्यमातून निशुल्क २५ बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.  या कोविड केअर सेंटर चे उदघाटन करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार , मानवलोक चे अनिकेत लोहिया, दै.लोकप्रभा चे संपादक संतोष मानूरकर, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, डॉ. काळे, कृषिभूषण शिवराम घोडके, प्रमोद घोडके, सागर वाहुळ, शुभम घोडके व माझ्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. कृषिभूषण शिवराम घोडके व गावातील तरुणांच्या या प्रयत्नातून हे कोविड केअर सेंटर सुरू झाले. ग्रामीण भागात वाढलेली रुग्णांची संख्या पाहता जास्त लोकसंख्या असलेल्या गावात असे कोविड केअर सेंटर झाल्यास आरोग्य यंत्रणेला सहकार्य होईल. याप्रसंगी उपस्थित राहुन त्यांच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या व सर्वांना आरोग्यविषयक काळजी घेण्याची विनंती केली. या सेंटर ला काल दैनिक लोकाशाच्या टीम ने भेट दिली यावेळी वृत्तसंपादक भागवत तावरे , उपसंपादक नितीन चव्हाण , मुक्तपत्रकार संतोष ढाकणे , धनंजय गुंदेकर कडून सेंटर ची पाहणी व चर्चा करण्यात आली . 

Exit mobile version