बीड । दि. २२ ।
राज्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या प्रलंबित कामांविषयी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील संसद सदस्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खा.प्रितमताई मुंडे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील बीड जिल्ह्यात प्रलंबित असलेले प्रश्न मांडले, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
राज्यातील ज्या रस्त्यांचे त्रुटीहीन डीपीआर तयार आहेत त्या रस्त्यांना मंजुरी देण्याचे निर्देश या बैठकीत मंत्री महोदयांनी दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील त्रुटीहीन डीपीआर तयार असलेल्या रस्त्यांना मंजुरी मिळणार आहे. तसेच केंद्रीय ग्रामविकास विभागाअंतर्गत सुरू असलेली आणि प्रलंबित कामे गतीने पूर्ण होणार असल्याची माहिती खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी दिली.
••••